Posts

Image
दिवाळी पाडव्याच्या दिवस, सकाळ सकाळी फोन गुणगुणला.. पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला नव्हता हे माहीतच होतं म्हणुन उचलला. दिप्या (दिपक झेले): कुठे आहेस? (मोबाईल वापरणाऱ्यांचा हा ठरलेला प्रश्न.) मी (चेतन पडियार): आहे की इथंच. (ठरलेलं पण कोड्यात टाकणार उत्तर, हे उत्तर ऐकून समोरच्याला कळतं की जाऊदे आता मुद्द्यावर च हाथ घालू.) दिप्या: काय कुठला प्लॅन बनवला आहेस का? मी: हो रे, सिद्ध्या (सिद्धार्थ पेंडुरकर), मॅक (मकरंद गडकरी) च आणि माझं झालंय व्हाट्सऍप वर बोलणं.. ए एम के (A M K ) ठरतंय. दिप्या: कधी बसूयात? (अर्थात ठरवायला बर का!) मी: येत्या शनिवारी मॅक च्या घरी, सगळे येतायत. दिप्या: ओके, येतो. खरं तर ट्रेक च म्हणजेच भटकंती च वेड जेव्हा पासून लागलं तेव्हापासून वेगवेगळे किल्ले बघून झाले, नवनवीन माणसं जोडली गेली, असंख्य आठवणी मनात कायमस्वरूपी बिंबविल्या गेल्या. खूप सारे ब्लॉग्स व पुस्तकांच वाचन आणि त्यातूनच महाराष्ट्रातील ऐतिहासिक तसेच भौगोलिक स्थळांची माहिती मिळत गेली. प्रत्येक दुर्ग किंवा पर्यटन स्थळ पाहून होईल की नाही याची खात्री कधीच नव्हती आणि आजही नाही म्हणून मी एक गोष्ट